आज घाटकोपर विधानसभा समन्वयक इम्रान भाई शेख व नगरसेविका साकिना आयुब शेख यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. ✨ या प्रेरणादायी कार्यक्रमात इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच विविध स्मार्ट गिफ्ट्स देऊन गौरव करण्यात आला. माझ्या शाळेतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही स्मार्ट वॉच व बॉटल देऊन सन्मानित करण्यात आले, याचा विशेष आनंद वाटला. 🎓📚 कार्यक्रमात विविध शाळांचे माननीय मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवरांशी संवाद साधण्याची आणि शिक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य व समाजहिताच्या अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना नव्या स्वप्नांसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. मनःपूर्वक आभार इम्रान भाई शेख व साकिना आयुब शेख यांचे. 💐 #गुणगौरवसोहळा #विद्यार्थीगौरव #ghatkopar #littleflowerschool #ट्रेंडिंग